संगिता पवार प्रतिनिधी [ medical Advance prastav ] : वैद्यकीय अग्रीम प्रस्ताव बाबत सर्वकाही माहिती या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या दिनांक 10.02.2006 रोजीच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचारी / अधिकारी यांना 05 गंभीर आजारावर सरकारी अथवा शासनमान्य खाजगी रुग्णालयातील उपचार करीता वैद्यकीय अग्रीम मंजूर करण्याची तरतुद आहे .
पाच गंभीर आजार :
- हृदय शस्त्रक्रियेची प्रकारणे
- हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
- अन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया
- मुत्रपिंड प्रतीरोपण शस्त्रक्रिया
- सर्व प्रकारचे कर्करोग
वरील नमुद आजारावरील आंतररुग्ण त्याचबरोबर बाह्यरुग्ण औषधोपचार तसेच आवश्यक उपकरणांची किंमती औषधांची खरेदी करण्यासाठी अग्रीम मंजूर होवू शकते .
अग्रीम मंजुरीस पात्र कर्मचारी : जे कर्मचारी वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मिळविण्यास पात्र असतील असे कर्मचारी स्वत : च्या व त्यांच्यावर अवलंबू न असणाऱ्या कुटुंबियांच्या उपचार करीता अग्रीम मागणी करता येते .
वैद्यकीय अग्रीम मर्यादा : दि.10.02.2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार कमाल वैद्यकीय अग्रीमाची रक्म ही 150,000/- पर्यंत मंजूर करता येते .
वैद्यकीय अग्रीम करीता आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे :
01.कर्मचाऱ्यांचा अग्रीम मागणी
02.ज्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणार आहे , त्या रुग्णालयाचे उपचार करीता लागणारा संभाव्य खर्च ( Estimate Certificate )
03.इतर विमा कंपनी , सामाजिक संस्थ / धर्मादाय संस्था / अन्य वित्तीय संस्था / खासदार , आमदार फंडातुन अर्थसहाय्य घेतले नसले बाबत प्रमाणपत्र .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
04.कुटुंब मर्यादेत असले बाबत प्रमाणपत्र
05.रुग्ण अवलंबतेचा दाखला
06.यापुर्वी अग्रीम घेतले नसले बाबत प्रमाणपत्र
07.कुटुंबात इतर कोणी निवृत्तीवेतन घेत नसले बाबत अथवा इतर कोणी सरकारी नोकरीत नसले बाबत प्रमाणपत्र .
अग्रीम प्रस्ताव करीता जोडावयाचे आवश्यक प्रमाणपत्रे नमुने :
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025