राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा नियामांमध्ये सुधारणा करण्यात आलेली अधिसुचना दि.28.01.2025 ; जाणुन घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Notification regarding amendments in leave rules for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा नियमांमध्ये सुधारणा करणेबाबतचा वित्त विभाग मार्फत दिनांक 28.01.2025 रोजी सुधारित अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे .

रजा नियम : नैमित्तिक रजा मागे – पुढे आलेली कोणत्याही संख्येतील शनिवार , रविवार व / किंवा सार्वजनिक सुट्या जोडून घेण्याची तसेच नैमित्तिक रजेमध्ये आलेली सुटी अथवा सुट्यांची मालिका नैमित्तिक रजेस जोडून घेण्याची परवानगी देता येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच एकावेळेस सलग पणे घेण्यात आलेल्या नैमित्तिक रजा व सुट्या यांचा एकुण कालावधी , 07 दिवसांपेक्षा अधिक असणार नाही तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये 10 दिवसांपर्यंत वाढवता येणार आहे .तर एका कैलेंडर वर्षांमध्ये केवळ 08 नैमित्तिक रजा अनुज्ञेय असणार आहेत .

अखंडित रजा : कोणत्याही कर्मचाऱ्यास सलग 05 वर्षे पेक्षा अधिक काळाकरीता कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करता येत नाही . अपवादात्मक स्थितीमध्ये वित्त विभागाने निर्धारित केल्याखेरीज जो कर्मचारी स्वीयेत्तर सेवा व्यतिरिक्त , रजेसह अथवा रजेशिवाय सलग …

हे पण वाचा : गट ड (वर्ग – ४) संवर्गातील 153 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

05 वर्षे पेक्षा अधिक काळासाठी अनुपस्थित राहील त्या कर्मचाऱ्याने आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे असे मानण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .अशा कर्मचाऱ्यास वाजवी संधी दिली जाते , याकरीता सदर कर्मचाऱ्यास नोंदणीकृत पोच देय डाकेने अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दिलेली सुचना देणे आवश्य असेल . सदर सुचना दिल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत सदर कर्मचाऱ्यांने उत्तर सादर करायवयाचे असते .

इतर सुधारित रजा विषयक नियमावली पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment