आता राज्य कर्मचाऱ्यांना या प्रमुख मागणींवर निर्णयाची अपेक्षा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या ..

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Now state employees expect a decision on these major demands ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत . या मागण्यांसाठी राज्य कर्मचारी वेळोवळी राज्य सरकारकडे निवेदन सादर करीत आहेत . प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहेत ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

01.टी.ई.टी अनिवार्यता रद्द करण्यात यावी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील इयत्ता 01 ते 08 वी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना पुढील 02 वर्षात टी.ई.टी उत्तीर्ण बंधनकारक करण्यात आले आहे . सदर अनिवार्यतेचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली जात आहे .

02.जुनी पेन्शन योजना : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युपीएस व राज्य सरकारने लागु केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एका पेन्शनची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . परंतु जुनी पेन्शन प्रमाणे लाभ सदर दोन्ही पेन्शन योजनांमध्ये मिळत नसल्याने जुनी पेन्शन योजनाच पुर्ववत करण्याची मागणी केली जात आहे .

03.सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे : केंद्र सरकार सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याच्या तयारीत आहे , तर राज्य सरकार मार्फत निवृत्तीचे वय 58 वर्षे वरुन 60 वर्षे करण्यास सकारात्मक नसल्याने , राज्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी आहे .

सदर निवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास अनेकांना पदोन्नतीची संधी , पेन्शन मधील वाढ शिवाय निवृत्ती नंतरचे आर्थिक लाभ मध्ये वाढ होईल .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment