कुणबी मराठा प्रमाणपत्र फक्त यांनाच मिळणार ? GR मधील मजबुत अट – तसेच हैद्राबाद गॅझेटियर लागु केल्याने इतर जातींच्या आरक्षणाचा पेच !

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Only those who will get Kunbi Maratha certificate? Know the strict terms and conditions in GR ] : मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र देणेबाबत , काल दिनांक 02 सप्टेंबर 2025 रोजी त्रीस्तरीय समितीमार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर समितीने ज्यांच्याकडे पुरावे आहेत , फक्त त्यांनाच कुणबी मराठा प्रमाणपत्र देता येणार आहेत . याकरीता कालच्या शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या कार्यपद्धतीमध्ये काही मजबुत अटी / शर्ती नमुद करण्यात आलेली आहेत .

हैद्राबाद गॅझेटियर मध्ये कोणता पुरावा : हैद्राबाद गॅझेटियर मध्ये मराठवाडा विभागातील जनगणना व जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे . यानुसार मराठवाड्यातील मराठा समजाचा उल्लेख हा कुणबी मराठा करण्यात आलेला आहे . त्या आधारे मराठ्यांना कुणबी मराठा असे ओबीसीमधून आरक्षणे देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे . सदर मागणी अखेर सरकारकडून मान्य करण्यात आलेली आहे .

कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती मधील अटी / शर्ती : कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी भुधारक अथवा भुमिहीन किंवा जमिनीची मालकी असल्याचा व ती जमिन कसत असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे . सदर पुरावा नसल्यास दिनांक 13.10.1967 पुर्वीचे वास्तव्याचा पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल .

याशिवाय आपल्या नात्यामधील अथवा कुळामधील कोणी एका व्यक्तीचे कुणबी जात असल्याचे प्रमाणपत्र स्थानिक चौकशी समितीसमोर अहवालास सादर करता येणार आहे . सदर अहवाल विभागीय चौकशीच्या अधिन राहून प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे .

हैद्राबार गॅझेटियर नुसार स्वातंत्रपुर्व काळात सन 1918 मध्ये काढण्यात आलेल्या आदेशानुसार मराठा समाजाला ( मराठवाड्यातील ) शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा आदेश काढला होता .

हैद्राबार गॅझेटियर : या गॅझेटियर नुसार राज्यातील इतर समाजाचा उल्लेख हा जसे कि बंजारा समाजाचा उल्लेख हा एसटी मध्ये आहे , तसेच कैकाडी समाजाचा उल्लेख प्रांत निहाय एसटी प्रवर्ग मध्ये उल्लेख आहे . यामुळे हैद्राबाद गॅझेटियरच्या आधारे सदर समाजाला देखिल न्याय मिळाणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .

Leave a Comment