“या” जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना 02 दिवस स्थानिक सुट्टी जाहीर !

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ holiday ] : सार्वजनिक सुट्टी ही सरकार मार्फत अधिसुचनेत नमुद करण्यात येत असतात , परंतु स्थानिक सुट्टी ही संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी / विभागाचे आयुक्त मार्फत जाहीर करण्यात येते .

स्थानिक सुट्टीचे दिवस :

अ.क्रदिनांक / वारउत्सव / सन
01.दि.22.09.2025 , सोमवारघटस्थापना
02.दि.20.10.2025 , सोमवारनरक चतुर्दशी

कोणत्या जिल्ह्यांना सुट्टी असेल ? : सदरचे दोन्ही सण हे हिंदु धर्मीयांना महत्वपुर्ण आहेत , त्या अनुषंगाने राज्यातील पुणे व सोलापुर या दोन जिल्ह्यांना स्थानिक सुट्टी संबंधित विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी मार्फत घोषित करण्यात आलेली आहे .

सप्टेंबर महिन्यातील सुट्टीचे दिवस : दिनांक 06 सप्टेंबर या दिवशी अनंत चतुर्दशी वार शनिवार , या दिवशी गणेश विसर्जन आहे , तसेच मुस्लिम समाजाचा ईद ए मिलादुन हा सण आहे ,या दिवशी सुट्टी आहे . ईद ए मिलादुन नबी चे जुलुस करीता सोमवारी सुट्टीची मागणी : ई-ए मिलादुन या दिवशी मुस्लिम समाजाकडून जुलुस काढण्यात येतो , यंदा गणेश विसर्जन व ई-ए मिलादुन एकाच दिवशी आल्याने , 06 सप्टेंबर ऐवजी 08 सप्टेंबर वार सोमवारी ई-ए – मिलादुन ची सुट्टी जाहीर करण्याची मागणी भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे .

Leave a Comment