Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ rain update upto 18 sep. ] : दिनांक 18 सप्टेंबर 2025 पर्यंतचा हवामान अंदाज हवामान खात्यांकडून जाहीर करण्यात आलेला आहे .
मराठवाडा : मराठवाडा विभागामध्ये यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे . आजपासुन ते दिनांक 17 सप्टेंबर पर्यंत नांदेड , लातुर , धाराशिव , हिंगोली , परभणी , छ.संभाजीनगर , जालना या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्ततवण्यात आलेली आहे .
पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिनांक 13 ते दिनांक 18 सप्टेंबर पर्यंत कोल्हापुर , सातारा , सांगली , सोलापुर , या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात नाशिक , धुळे , नंदुरबार , जळगाव या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्ततिवण्यात आलेली आहे .
विदर्भ : विदर्भामध्ये चंद्रपुर , यवतमाळ , गोंदिया , भंडारा , नागपुर , वर्धा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .