अनुदानित शाळांचे माहे ऑक्टोंबर 2025 चे नियमित वेतन देयके अदा करणेबाबत ; महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.10.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding payment of regular salary payments for October 2025; Important circular issued ] : अनुदानित शाळांचे माहे ऑक्टोंबर 2025 चे नियमित वेतन देयके अदा करणेबाबत , अधिक्षक ( माध्यमिक ) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा नाश्किा मार्फत दिनांक 14.10.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे ऑक्टोंबर 2025 चे नियमित वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड करणेबाबत आदेश देण्यात आलेले आहेत . यानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 06.02.2023 नुसार 20 टक्के व वाढीव 20 टक्के वेतन अनुदान देय असलेल्या पात्र असणाऱ्या शाळेतील व तुकड्यांवरील पात्र शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक 25.08.2025 रोजीच्या व दिनांक 01.08.2025 पासुन 20 टक्के …

वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे . व मा. शिक्षण उपसंचालक नाशिक व शिक्षणाधिकारी ( माध्यिमक ) जि. प नाश्किा यांच्या मार्फत टप्पा अनुदान आदेश देण्यात आले आहेत .

तरी पात्र शाळा / कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालये यांना टप्पावाढ अनुदान आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यांना शासन निर्णय दिनांक 25.08.2025 नुसार टप्पा माहे ऑक्टोंबर 2025 या महिन्यांचे वेतन देयक दिनांक 15.10.2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपावेतो ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच कोणताही कर्मचारी वेतनापासुन वंचित राहणार नाही याची मुख्याध्यापकांनी दक्षता घेण्याचे तसेच दिलेल्या टप्पावाढ देयकांबाबत , स्वतंत्र सुचना देण्यात येतील , मा. शिक्षण उपसंचालक यांच्या सदरच्या यादीनुसार ऑनलाईन प्राप्त देयकांची सदर कार्यालयाच्या स्तरावर पडताळणी करुन..

 यादीमधील कर्मचाऱ्यांचीच देयके कोषागारात अनियमितता केल्याचे आढळून आल्यास , सदर कर्मचाऱ्यांवर व मुख्याध्यापकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .

राज्य कर्मचारी असाल तर 104 कर्मचारी विषयक शासन निर्णयाची पुस्तिका आपल्या संग्रही असणे , अत्यंत फायदेशीर .. PDF स्वरूपात व्हाट्सअप वर सेंड केली जाईल लगेच खरेदी(किंमत फक्त 100/- रुपये) करण्यासाठी  Click Here

Leave a Comment