राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतुक भत्ता ( TA ) लागु करणेबाबत , GR निर्गमित दि.26.09.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the implementation of revised Transport Allowance (TA) to State Employees, GR issued on 26.09.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतुक भत्ता लागु करणेबाबत , राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांचे वित्त विभागाच्या दिनांक 20.04.2022 रोजीच्या निर्णयाच्या तक्ता क्र.01 व 02 मध्ये  दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ताचे दर हे दिनांक 01 एप्रिल 2022 पासुन सुधारित करण्यात आले आहेत .

वित्त विभागाच्या दिनांक 20.04.2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कर्तव्य स्थानापासुन 01 कि.मी अंतराच्या आत तसेच कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतुक भत्ता अनुज्ञेय असणार नाही , अशा प्रकारची तरतुद करण्यात आलेली आहे .

परंतु केंद्र सरकारच्या दिनांक 15.09.2022 रोजीच्या ज्ञापनानुसार , केंद्र सरकारच्या पात्र दिव्यांग कर्मचारी यांना कर्तव्यस्थानापासुन 01 कि.मी  अंतराच्या आत सरकारी / खाजगी निवासस्थानात राहत असेल अथवा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवास स्थानात वास्तव्यास असेल ..

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

तरीही त्यांना सर्वसाधारण दराच्या दुप्पट दराने वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील अशा प्रकारची तरतुद करण्यात आलेली आहे . यानुसार राज्य सरकारच्या सदर तरतुदी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ( कर्तव्यस्थानापासुन 01 कि.मी अंतरावर वास्तव्य करणाऱ्या ) दिनांक 20.04.2022 रोजीच्या निर्णयातील वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील अशी तरतुद करण्यात आलेली आहे .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment