Reliance : रिलायन्स फाउंडेशन मार्फत पदवी प्रवेश विद्यार्थ्यांना मिळत आहे 2 ते 6 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती ; दि.04.10.2025 पर्यंत करता येईल अर्ज !

Spread the love

 Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Reliance: Degree admission students are getting scholarships ranging from Rs 2 to 6 lakhs through Reliance Foundation. ] : रिलायन्स फाउंडेशन मार्फत श्री.धीरुभाई अंबानी जयंती निमित्त 10 वर्षांच्या काळात तब्बल 50,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा मानस आहे .

देशातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावेत , याकरीता गरीब व गरजु विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी सदर शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आलेली आहे . सदर शिष्यवृत्ती योजना ही पदव्युत्तर शिष्यवृत्ती योजना व अंडग्रेजुएट शिष्यवृत्ती योजना अशा स्वरुपात दिले जाते .

रिलायन्स अंडरग्रेजुएट शिष्यवृत्ती योजना : सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थ्यांचे 12 मध्ये किमान 60 टक्के गुण घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तर सन 2025-26 या वर्षात त्याने पदवी अभ्यासक्रम साठी प्रवेश असावेत . सदर विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 15 लाख रुपये पेक्षा कमी असावेत . तर ज्यांचे उत्पन्न हे 2.5 लाख रुपये पेक्षा कमी आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल .

आर्थिक लाभ : अंडरग्रेजुएट शिष्यवृत्ती योजना अंतर्गत पात्र / निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी कालावधीत 2,00,000/- रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते .

रिलायन्स फाउंडेशन पदव्युत्तर शिष्यवृत्ती योजना : गेट परीक्षा उत्तीर्ण व त्यामध्ये 550-1000 दरम्यान गुण मिळवून पदव्युत्तर शिक्षण अथवा पदवीपुर्व CGPA मध्ये 7.5 अथवा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक असेल .

आर्थिक लाभ : 6,00,000/- रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते .

अर्ज प्रक्रिया : पात्र तसेच इच्छुकांनी  https://reliance-foundation या संकेतस्थळावर दिनांक 04.10.2025 पर्यंत आवेदन सादर करावेत .

Leave a Comment