राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये 02 वर्षांची वाढ होणार ; जाणून घ्या सविस्तर अपडेट !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Retirement age of state employees to be increased by 02 years ] : राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन असणारी सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांनी वाढ होवू शकते . याबाबतची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात .

निवृत्तीचे वय : सध्यस्थितीमध्ये राज्यातील गट ड संवर्ग वगळता उर्वरित गट अ , ब व क संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे इतके आहे . तर गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे इतके आहे .

निवृत्ती वयात 02 वर्षांची वाढ करण्याची मागणी : सेवानिवृत्तीच्या वयात 02 वर्षे वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच वर्षांपासुन होत आहे . सदर 02 वर्षे वाढ केल्याच्या नंतर राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 60 वर्षे इतके होणार आहे .

निवृत्तीच वय वाढविण्याची आवश्यकता : सध्या शासन सेवेत नोकरीसाठी किमान 30 वर्षे लागुन जात आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांना कमी सेवा मिळते तसेच पदोन्नतीच्या संधी 01 , 02 वर्षांमुळे हुकली जाते . यामुळे कर्मचाऱ्यांच्या वतीने निवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक आहे .

तर सेवानिवृत्तीचे वय वाढ केल्यास , कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा हा प्रशासकीय कामात तत्परता येवू शकेल . तसेच रिक्त पदांचा अतिरिक्त बोजा इतर कर्मचाऱ्यांवर येणार नाही .

हे पण वाचा : महापारेषण  पिंपरी – पुणे अंतर्गत पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

प्रशासकीय हालचाली : सेवानिवृत्तीचे वय वाढ बाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत विधेयक तयार करण्यात आलेले होते ,व ते मंजूरीसाठी अधिवेशनात देखिल मांडण्यात येणार होते .सदर निवृत्तीचे वय वाढ करीता काही विधानसभा सदस्य व स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनांकडून विरोध केल्याने , सदर विधेयक प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे .

परंतु तत्कालिन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दानुसार , कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करणेबाबत , सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment