आज दि.01 सप्टेंबर रोजीच्या काही देश -विदेश , राज्यातील काही प्रमुख टॉप घडामोडी !

Spread the love

Mh-tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Some of the major top events in the country, abroad and the state today, September 1st ] : आज दिनांक 01 सप्टेंबर रोजीच्या देश – विदेश त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख टॉप घडामोडी या लेखांमध्ये जाणून घेवूयात .

मराठा आंदोलन : सध्या मुंबई मध्ये सर्वत्र मराठा आंदोलकांनी मोठ्या सर्तीने आपल्या मागणींवर ठाम आहेत , तर सदर आंदोलकांचे प्रमुख श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलनांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे असा आरोप करीत ॲड.श्री.गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे . तसेच राज्यातील ओबीसी आमदार एकत्र येवून , मराठा आरक्षणांच्या विरोधात भुमिका घेत आहेत .

DMart Special Offers : डी-मार्ट शॉपिंग मॉल मध्ये आपणांस इतर शॉपिंग मॉल पेक्षा स्वस्तात वस्तु मिळतात , आता डी-मार्ट मध्ये सध्या 50 टक्के पर्यंत सवलत देणारे मेगा डिस्काउंट ऑफर सुरु झाले आहे .

हवामान अंदाज ( Rain Update ) : माहे सप्टेंबर महिन्यांच्या सुरुवातीच्या दिवशीच देशातील काही भागांमध्ये ( उत्तराखंड , दक्षिण हरियाणा , दिल्ली , राजस्थान ) ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

ITR भरणाची अंतिम मुदत 15 सप्टेंबर : आयकर रिटर्न भरणा करण्याची अंतिम मुदत ही दिनांक 15 सप्टेंबर 2025 अशी असून , तत्पुर्वी ज्यांनी भरणा केला नाही , अशांनी भरणा करुन घ्यावेत .

फॉर्म नंबर 17 : खाजगीरित्या ( बाहेरुन – केवळ परीक्षासाठी प्रवेश ) इयत्ता 10 वी व 12 वी ( SSC & HSC ) ला फॉर्म नंबर 17 भरुन प्रवेश दिला जातो , याकरीता अंतिम तारीख ही 15.09.2025 असून , परीक्षा शुल्क 1 हजार 110 रुपये इतकी आहे . तर विलंब झाल्यास 100/- रुपये अतिरिक्त भरणा करावा लागेल .

ई-पीक पाहणी : ई – पीक पाहणीवर मोबाईल ॲपवर ( DCS : 4.0 या अपडेट ॲपवर )  ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगाम पिकाची नोंदणी करण्यासाठी अंतिम दिनांक ही 15 सप्टेंबर वरुन वाढवून 23सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे .

Leave a Comment