Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ state employee shasan nirnay dated 15 September ] : राज्य अधिकारी / कर्मचारी विषयक दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी 05 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.महाराष्ट्र विकास सेवा (गट ब ) मधील सहायक गट विकास अधिकारी ( वेतनश्रेणी एस – 16 ) संवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी , गट अ ( एस – 20 ) संवर्गात तदर्थ पदोन्नती देणेबाबत ग्राम विकास विभागांकडून मंजूरी देण्यात येत आहे .
02.जुनी पेन्शन योजना : दिनांक 01.11.2005 पुर्वीची पदभरतीची जाहीरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या परंतु दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यास ( श्री.अरविंद विखे , अधिक्षक ( सारासे ) शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून मंजूरी देण्यात येत आहे .
03.वेतन अनुदान : प्राथमिक शिक्षण , प्रधानमंत्री जनजाती उपायोजना , सर्वसाधरण शिक्षण , आदिवासी न्याय महाअभियान इ. लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यास शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजूरी देण्यात येत आहे .
हे पण वाचा : आठवा वेतन आयोगात पे लेव्हल S 1 ते S 15 पर्यंतचे सुधारित मुळ वेतनश्रेणी तक्ता ;
04. अनुकंपा नियुक्ती : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट – ड मधील शिपाई ( गट ड ) या संवर्गातील पदे हे अनुकंपा नियुक्तीकरीता पुनर्जिवित करण्यास उद्योग व उर्जा व कामकार व खनिकर्म विभाग मार्फत मंजूरी देण्यात येत आहे .
05.पदोन्नती करीता ज्येष्ठतेनुसार यादी : गट क मधील लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नती करीता अर्हता प्राप्त असणाऱ्या मंत्रालयीन विभाग मधील गट ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2025 रोजीच्या अंतिम ज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
वरील संदर्भातील पाचही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !