जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ State employees will get these 03 financial benefits in January ] : माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत . ज्यामुळे एकुण वेतनात मोठी वाढ होणार आहे .

01.डी.ए वाढ : माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के महागाई भत्ता वाढ केला जाणार आहे . ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55 टक्के वरुन 58 टक्के इतका होणार आहे.

02.महागाई भत्ता थकबाकी : महागाई भत्ता 3 टक्केने दि.01.07.2025 पासुन वाढ होणार असल्याने , दि.01.07.2025 पासुनची डी.ए थकबाकी माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत अदा केली जाणार आहे .

03.प्रोत्साहन भत्ता फरक : राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार , आदिवासी / नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणेकरीता , प्रोत्साहन भत्ता मुळ वेतनाच्या 15 टक्के किमान 200/- व कमाल 1500/- रुपये या मर्यादेत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदरचा भत्ता हा सहावा वेतन आयोगापासुन अदा केला जाणार असल्याने दि.01.01.2006 पासुन सदर प्रोत्साहन भत्ता फरक अदा केला जाणार आहे .

Leave a Comment