प्राथमिक शिक्षकांच्या TET अनिवार्यताच्या विरोधात दाखल याचिकेवर सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Supreme Court’s big decision on a petition filed regarding TET mandatory for primary teachers ] : शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यताच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच मोठा निर्णय दिला आहे .

सुप्रिम कोर्टाचा टीईटी अनिवार्यता नियम : दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी सवोच्च न्यायालयाने निर्णय देत इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल , जे उत्तीर्ण नाहीत अशांना पुढील 02 वर्षात उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल . तर ज्यांचे निवृत्तीचे वय हे 05 वर्षे बाकी आहेत….

अशांना सदर परीक्षा मधून सुट देण्यात आलेली आहे . सदरचा निर्णय हा न्यायमुर्ती दीपांकर दत्ता व जस्टिस ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांनी दिला होता . या निर्णयामुळे शिक्षक पुन्हा एकदा चिंतेत पडले आहेत .

सवोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका देशातील राज्य सरकारसह अनेक वैयक्तिक याचिका दाखल झालेल्या आहेत . यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे .

टीईटी पुनर्विचार याचिका निकाल : TET अनिवार्यता पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत स्पष्ट केले आहे कि , सदरचा विषय हा वैधानिक विषय आहे . याबाबत अनेक कायदेशिर बाबी व प्रश्न आहेत , यावर निर्णय घेण्याकरीता मोठ्या पीठाचे गठण करुन…..

राज्यातील शिक्षक / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित पुस्तिका PDF स्वरूपात .. फक्त 250/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी Click Here

विस्तृत प्रश्नांवर चर्चा करुनच यावर निर्णय घेतला जावू शकेल . असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment