राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवाल ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये परीक्षा पास व्हावे लागणार…अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Teachers in the state will be hanged; Pass the exam or face compulsory retirement as per the order of the Supreme Court ] : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवाल आली आहे , कारण जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत , अशांना सक्तीची निवृत्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य : प्राथमिक शिक्षकांना टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 13.02.2013 सेवेत रुजु होणाऱ्यांना उत्तीर्ण होणे आवश्यक आहे , परंतु नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार …

दि.13.02.2013 पुर्वी देखिल रुजु होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आता पुन्हा टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे . उत्तीर्ण होण्यासाठी 02 वर्षांचा अवधी देण्यात येणार आहे , अन्यथा सक्तीची निवृत्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

या शिक्षकांना मिळणार सुट : ज्यांची सेवा ही 05 वर्षे बाकी आहेत , म्हणजेच 53 वर्षे वया पलीकडील शिक्षकांना सदर टीईटी परीक्षा देण्यापासुन सुट देण्यात आली आहे .

सन 2013 पुर्वी रुजु होणाऱ्या प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्‍तीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य नव्हते , परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनाच टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे .

Leave a Comment