शिक्षक पात्रता परीक्षा ( TET) अनिवार्यता संदर्भात सुधारित परिपत्रक निर्गमित दि.19.01.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ Revised circular regarding Teacher Eligibility Test (TET) Mandatory issued on 19.01.2026 ] : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्यता संदर्भात राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे .

सदरचे परिपत्रके राज्यातील शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आली आहे . यामध्ये नमूद करण्यात आली आहे की शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक , मुख्याध्यापक , समूह साधन केंद्र समन्वयक ( केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे .

सदर न्याय निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आलेली आहे , याबाबतचे अभिप्राय अद्याप पर्यंत अप्राप्त आहेत .

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजीच्या न्याय निर्णय पारित झाल्याच्या दिनांक पासून दोन वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक , मुख्याध्यापक , समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर तुर्तास  पदोन्नती देता येणार नाही .

ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण (TET ) या अर्हता त्याचबरोबरच पदोन्नती साठी आवश्यक अन्य शैक्षणिक अर्हता धारण केली आहे , केवळ असे शिक्षक पदोन्नती करिता पात्र ठरणार आहेत असे निर्देश सदर शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे .

Leave a Comment