Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 06 major important Government Decisions (GR) were issued on 24.02.2026 regarding State Officers/Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.24.02.2026 रोजी 06 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.वेतन / भत्ते निधी वितरण : राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन /भत्ते अदा करणेकामी सन 2025-26 करीता अर्थसंकल्पिय तरतुदीमधून निधीचे वितरण करण्यास सामान्य प्रशासन विभागाकडून मंजूरी देण्यात येत आहे .
02.सेवांतर्गत प्रगती योजना : शासकीय महाविद्यालये / संस्था यामधील सहाय्यक प्राध्यापक यांची सेवांतर्गत प्रगती योजना अंतर्गत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मध्ये स्थाननिश्चिती करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मंजूरी देण्यात येत आली आहे .
03.पदोन्नती : भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय , नागपुर यांच्या आस्थापनेवरील भूवैज्ञानिक या संवर्गातून वरिष्ठ भूवैज्ञानिक या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभाग मार्फत मंजूरी देण्यात येत आहे .
04.सेवाशुल्क वसुलीबाबत : कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानाच्या सेवाशुल्क वसुलीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मंजूरी देण्यात येत आहे .
05.सहाय्यक अनुदाने : सन 2025-26 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच , उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहायक अनुदान हिस्सा वितरीत करण्यास ग्राम विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे .
06.अनुदाने वेतनेतर : मतिमंद प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदाने वेतनेतर निधी वितरीत करण्यास दिव्यांग कल्याण विभागाकडून मंजूरी देण्यात येत आहे .
वरील सर्व ( 6 ) शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरीता Click Here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026