Mh-tv@24 : खुशी पवार प्रतिनिधी [ These are the rules of eating to live a healthy life. ] : आयुष्यांमध्ये निरोगी / दीर्घायुषी जीवन जगण्याकरीता काही नियम आहेत , त्या नियमांचे पालन केल्यास आपण खुशाल / आनंददायी आयुष्य जगु शकता ..
भारतीय लोकांची एक व्यथा आहे , ती म्हणजे आयुष्यभर पैसा कमविण्याच्या मागे धावपळ करत राहतात , यामुळे जिवन जगण्याचे विसरुन जातात . तसेच आपल्या आरोग्याची आवश्यक अशी देखभाल करु शकत नाही . यामुळे दीर्घायुषी मिळण्यास अनेक अडचणी येतात .
स्वच्छता : आपल आवार , आपले शरीर नियमित व वेळोवळी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे , तसेच परिसरात मन मोहक करणारे बगिचे तयार करणे महत्वपुर्ण ठरते .
पीण्याचे पाणी : आजकाल आपण पीण्याच्या पाण्याकडे अधिक लक्ष देतो , परंतु पीण्याचे पाणी हे तांबे / पितळाच्या भांड्यात ठेवल्यास अधिक लाभदायक ठरते . फ्रिज पाण्याचे कधीच ठेवू नये किंवा ते सेवण करु नयेत . पाणी उकळुन पिल्यास शरीरास फायदेशिर ठरेल .
खाण्याचे पदार्थ : आजकाल आपण भाजीपाला हे फ्रिज मध्ये साठवून ठेवतो , परंतु फ्रिज मधील पदार्थ हे खाण्यासाठी योग्य नसतात . यामुळे रोजच्या रोज भाजीपाला ताजे खाणे फायदेशिर ठरते . आजकाल बाजारांमध्ये भाजीपाला हे केमिकल्स युक्त फवारणी केलेले विक्रीसाठी येतात . यामुळे आपण शक्य झाल्यास आपल्या परसबागेत भाजीपाल्याची लागवड करुन ते सेवण केल्यास उत्तमच ठरेल .
आपण भारतीय लोकं आपल्या जिभेला चविष्ठ असणारे अन्नपदार्थ खात असतो , यांमध्ये विविध प्रकारचे मसाले असतात . परंतु हे चविष्ठ पदार्थ आपल्याला अनेक आजार होण्यासाठी आमंत्रित करीत असतात . रेड मांस , बेकरीतील खाद्य , फास्टफुड , चायनिज पदार्थ , तळलेले पदार्थ शक्यतो जेवणांमध्ये टाळावेत .
नियमित व्यायाम : आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची हालचाल होणे आवश्यक आहे , यामुळे नियमित रित्या व्यायाम करणे आवश्यक आहे . ज्यामुळे दीर्घायुषी जगण्यासाठी लाभदायक ठरते , व्यायांमध्ये सुर्यनमस्कार , भारतीय दंड बैठका , प्राणायम , योगा करणे अधिक फायदेशिर ठरते .