राज्य कर्मचाऱ्यांना NPS कि UPS कोणती पेन्शन प्रणाली फायदेशिर ठरेल ? जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 प्रतिनिधी [ Which pension system will be beneficial for employees, NPS or UPS? ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना , सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन प्रणाली यापैकी एका पेन्शन प्रणालीची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .

यापैकी राष्ट्रीय पेन्शन योजना व युनिफाईड पेन्शन योजना यापैकी राज्य कर्मचाऱ्यांना कोणती पेन्शन प्रणाली फायदेशिर ठरेल , याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे घेवूयात .

राष्ट्रीय पेन्शन योजना : राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक प्रकारची शेअर मार्केट आधारावर आहे . तर यांमध्ये कर्मचाऱ्यांचे  मुळ वेतन व महागाई भत्ताच्या 10 टक्के योगदान तर सरकारचे 14 टक्के योगदान पगार झाल्यानंतर जमा केले जाते .

राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर NPS मधील जमा रकमेच्या 60 टक्के रक्कम ही एकरकमी दिली जाते , तर उर्वरित 40 टक्के रकमेवर पेन्शन दिली जाते .

ज्यांची सेवा ही अधिक आहे , अशांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळते . यामुळे निवृत्तीनंतर एखादा मोठा व्यवसाय करीता मोठी रक्कम मिळेल . तर अधिक सेवा असल्यास उर्वरित 40 टक्के रक्कम देखिल अधिक असेल , त्यावर मिळणारे लाभांश वर पेन्शन मिळते . परंतु सदर पेन्शन ही लाभांशवर आधारित असल्याने अनियमित असेल .

यामुळे ज्यांची सेवा अधिक आहे , अशांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली फायदेशिर ठरणार आहे . परंतु यांमध्ये निवृत्तीवेतन घेताना मृत्यु झाल्यास , कुटुंबास पेन्शन मिळणार नाही तर उर्वरित 40 टक्के रक्कम त्याच्या कुटुंबास मिळेल .

युनिफाईड पेन्शन योजना ( UPS ) : युपीएस पेन्शन योजना ही प्रकारे जुनी पेन्शनवर आधारित तयार करण्यात आली तरी यांमध्ये अनेक अटी व शर्ती आहेत . युपीएस पेन्शन प्रणालीमध्ये देखिल जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्तीनंतर शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळते .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

परंतु याकरीता किमान 25 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक असेल . अन्यथा किमान 10,000/- रुपये पेन्शनची तरतुद करण्यात आलेली आहे . तसेच यांमध्ये निवृत्तीवेतन घेताना मृत्यु झाल्यास , कुटुंबनिवृत्तीवेतन ( पेन्शनच्या 60% ) तरतुद आहे .एक प्रकारे यांमध्ये सामाजिक सुरक्षा अधिक आहे .

यामुळे ज्यांची सेवा ही अधिक आहे , त्यांना दोन्ही पेन्शन प्रणाली अधिक फायदेशिर ठरणार आहेत . याशिवाय ज्यांना काही कालावधीनंतर स्वेच्छा निवृत्ती घ्यायची आहे . त्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच फायदेशिर ठरेल , कारण युपीएस मध्ये स्वेच्छा निवृत्ती करीता पेन्शनची तरतुद करण्यात आलेली नाही .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment