Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Will the retirement age of government employees not be increased? Supreme Court decision. ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये वाढ करणेबाबत , सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे .
देशांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे राज्यांनुसार भिन्न आहेत , तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयांमध्ये देखिल फरक आहे . केंद्र सरकारसह देशातील तब्बल 25 राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहे .
केंद्र व देशातील 25 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यासह उर्वरित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीवय 60 वर्षे करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासुन सुरु आहे .
यावर सवोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार , सेवानिवृत्तीचे वयामध्ये वाढ करणेबाबत राज्य व केंद्र सरकार नियमावली तयार करतील . सेवानिवृत्तीचे वय हे बदलत्या काळानुसार बदलणे अपेक्षित आहे .
सेवानिवृत्तीचे वय हे तत्कालिन काळानुसार ठरविण्यात आलेली आहे . सध्याची स्थिती मध्ये देखिल राहणीमानाचा दर्जा जरी उंचावला असला , तरी अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य 50 वर्षाच्या नंतर साथ देत नाहीत .
यामुळे निवृत्तीचे वय हे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असावी असे स्पष्ट करण्यात आले आहेत . कारण आरोग्य चांगले नसल्यास त्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो .
अनुभव पेक्षा कार्यक्षमता अधिक महत्वपुर्ण आहे , न्यायालयाच्या सदर निर्णयामुळे निवृत्तीच्या वय वाढ बाबत , सरकार जे धोरण ठरवतील ते योग्य असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे . कारण निवृत्तीचे वय वाढविणे हा एक प्रकारचा वैधानिक विषय आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !
