दि.11 नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण निर्णय !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important decisions were taken in the state cabinet meeting held on November 11. ] : दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 05 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .

01.बँकांना सक्षमीकरणाला प्राधान्य : RBI बँकेंच्या निर्देशानुसार राज्यातील नाशिक , धाराशिव , नागपुर जिल्हा मध्यवर्ती बँकांना पुनर्भांडवल व पुनरुज्जीवन करण्यास एकुण 827 कोटी रुपये देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

02.न्यायालयांच्या सुरक्षता साठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती : राज्यातील न्यायालयीन परिसर , न्यायाधीश व न्यायमुर्ती यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षतता करीता 8,282 सुरक्षा रक्षक नियुक्तीस मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे .

03.5 वा वित्त आयोगाचा कालावधी मार्च 2026 पर्यंत : 5 व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमजबजावणी करण्याचा कालावधी आता वाढवून दिनांक 16.12.2020 ते दि.31.03.2026 असा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

04.डिग्रस साठवण तलाव करीता निधी : हिंगोली या जिल्ह्यातील डिग्रस साठवण तलाव करीता तब्बल 90 कोटी 61 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

05.हिंगोली सुकळी तलावास निधी : हिंगोली या जिल्ह्यातील सेनगांव तालुका सुकळी या साठवण तलाव प्रकल्पास मंजूरी देण्यात आली असून याकरीता तब्बल 124 कोटी 36 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

Leave a Comment