Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 3% increase in DA of government employees ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 3 टक्के वाढ करणेबाबत , अखेर सरकार मार्फत अधिकृत्त निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालय मार्फत दिनांक 06.10.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये दिनांक 01.07.2025 पासुन सुधारणा करण्यात येत आहे .
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या डी.ए चे दर दिनांक 01.07.2025 पासुन मुळ वेतनाच्या 55 टक्के वरुन 58 टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे .
यांमध्ये सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगांमध्ये मुळ वेतनावर आधारित महागाई भत्ता अदा करण्यात येईल . सदर डी.ए हा वेगळा घटक असुन , महागाई भत्ताचा एफ आर च्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
सदरचे आदेश हे संरक्षण सेवा अंदाजातुन मिळालेल्या नागरी कर्मचाऱ्यांना देखिल लागु असणार आहेत . तर सशस्त्र दलातील कर्मचारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकरीता संबंधित मंत्रालय मार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .
या संदर्भातील सविस्तर बातमी (वृत्त) पाहण्यासाठी Click Here

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक ) शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी Click Here
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025