Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding payment of salary for September paid in October ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबरचे वेतन अद्याप प्रलंबित आहे . याबाबत वित्त विभाग मार्फत ई-मेलद्वारे वेतनाची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक 06.08.2025 रोजीच्या सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही बाबत निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सदरची कार्यवाही पुर्ण न झाल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची माहे सप्टेंबर 2025 चे वेतन देयके अधिकदान व लेखा कार्यालय , कोषागारात / उप कोषागारात स्वीकारण्यात येणार नाहीत अशा प्रकारचे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहेत .
परंतु प्रत्यक्षांमध्ये सेवार्थ प्रणालीतील मंजुर पदांचा ताळमेळ घेत असताना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे . यामुळे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर 2025 च्या मासिक वेतन देयक प्रदान करणे अद्याप पर्यंत ( दिनांक 06.10.2025 पर्यंत ) प्रदान झालेले नाहीत .
हे पण वाचा : महागाई भत्ता 3% वाढ , अधिकृत बातमी पाहा ..
यामुळे मा.प्रधान सचिव वित्त विभाग तसेच मा.संचालकांच्या आदेशानुसार , माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर 2025 चे वेतन देयके कोषागारात / उप कोषागारात स्विकारुन पारित करणेबाबत , निर्देश देण्यात आलेले आहेत .
या निर्देशामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर 2025 चे वेतन देयके प्रदान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक ) शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी Click Here
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !