दि.17 , 18 ,19 व 20 नोव्हेंबर रोजी राज्याला मोठा अलर्ट जारी ; मुसळधार (अवकाळी) पावसाचा मोठा इशारा !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ A major alert has been issued for the state on November 17, 18, 19 and 20; a major warning of heavy (unseasonal) rains ] : सध्याचे हवामान अचानक बदलत आहे , यामुळे भारतीय हवामान खात्याने दिनांक 17 ते 20 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

देशात थंडी व अवकाळी पावसाची दुहेरी लाट : नोव्हेंबर महिन्यांच्या सुरुवातील पासुन राज्‍यात थंडीची लाट पसरली आहे . राज्यातील नाशिक , जळगाव , नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये थंडीचे लाट पसरली आहे .

याशिवाय देशात उत्तर प्रदेश , जम्मु काश्मिर , बिहार , पंजाब या राज्यात थंडीची मोठी लाट पसरली आहे . याशिवाय पाऊस अद्याप पर्यंत सुरुच आहे . बंगालच्या उपसागर मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने , पुढील 05 दिवस दक्षिण भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

हे पण वाचा :  पदवीधारकांसाठी तब्बल 2700 जागेवर महाभरती .

केळ राज्यात पुढील चार दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे , यामुळे मच्छिमारांना समुद्रात येवू नये असा इशारा दिला आहे . पुढील काही दिवस केरळ राज्याच्या किनारी भागासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

याशिवाय आंध्र प्रदेश किनारी भाग व अंदमान व निकोबार बेटे सह महाराष्ट्र राज्याच्या किनारी जिल्हे सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड , मुंबई या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .

Leave a Comment