राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 23 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 06 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 06 important Government Decisions (GR) were issued on 23rd September regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी 06 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.जुनी निवृत्तीवेतन : जलसंपदा विभाग मधील दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणी ज्यांना दिनांक 01.11.2005 नंतर रुजु करण्यात आले आहेत . त्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात येत आहे .

02.सुधारित आकृतीबंध : राज्यातील नगर विकास विभाग मधील आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेले असुन , यांमध्ये वाहनचालक व गड ड मिळुन 27 पदे बहुउद्देशिय पदे निर्माण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

03.थकीत वेतन अदा करण्यास मंजूरी : अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्यास शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजूरी देण्यात येत आहे .

हे पण वाचा : जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व त्यावर सरकारची घोषणा ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

04.शिपाई पद पुनर्जिवित : उच्च न्यायालय मुंबई महाधिवक्ता यांच्या कार्यालयामधील गट ड संवर्गातील शिपाई हे पद अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

05.अग्रिमे : सरकारी कर्मचारी कर्जे , मोटार वाहन खरेदी अग्रिमे , मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप इ . लेखाशिर्षाखाली विधी व न्याय विभाग मार्फत निधींचे वाटप करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .

06.घरबांधणी अग्रीमे : सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता कृषी विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रीमे करीता अनुदान वितरीत करण्यास कृषी व पदुम विभाग मार्फत मंजुरी देण्यात येत आहे .

वरील संदर्भातील सर्व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment