Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 08 major important cabinet decisions were taken in the cabinet meeting held on September 23rd. ] : दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत 08 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत .
01.रुग्णांना उपचार : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत गरजु असणाऱ्यांना यकृत , फफ्फुस , हृदय इ. प्रत्यारोपण करीता 5 लाख रुपये पेक्षा अधिक खर्च करीता राज्याच्या राखीव निधीमधुन खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
02.नागपुर – नागभीड रेल्वे मार्ग ब्रॉडगेज : नागपुर ते नागभीड रेल्वे मार्ग ब्रॉडगेकरीता सरकारच्या हिश्याच्या 491 कोटी 5 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
03.अकोला पालिका प्रशासनांस शहर बस स्थान व भाजी बाजार : अकोला या महानगरपालिकास वाणिज्य संकुल तसेच शहर बस स्थानक व भाजी बाजार उभारणीकरीता मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात येत आहे .
04.मुद्रांक शुल्क सवलत : कॉ.साने महिला गृहनिर्माण संस्था साठी नोंदणी व मुद्रांक शुल्क सवलत करीता मंजुरी देण्यात आली आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र बस महामंडळ अंतर्गत चालक , सहाय्यक पदांच्या 17450 जागेसाठी महाभरती !
05.वसई – विरार पालिकेसाठी जमीन : वसई विरार पालिकेसाठी मल्टी स्पेशालिटी दवाखाना करीता आचोळे येथे जमीन देण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
06.महाराष्ट्र साहित्य परिषद : महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक या शाखेकरीता सवलतीच्या दरामध्ये भुखंड देण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे .
07.जाहिरात फलक दुर्घटना : घाटकोपर बेकायदेशीर रित्या जाहिरात फलक दुर्घटना करीता संबंधित विभागांना 01 महिन्यांच्या मुदतीमध्ये कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
08.सामुहिक पुनर्विकास प्रकल्प : अंधेरीमधील सरदार वल्लभभाई पटेल नगर मध्ये म्हाडाच्या माध्यमातुन सामुहिक पुनर्विकास प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !