आठवा वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्ता वाहन भत्ता , प्रोत्साहन भत्ता इ.देय भत्ते बाजार किमतीवर आधारित मिळणार ..

Spread the love

Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ new pay commission new big update ] : आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते हे मूळ वेतनावर (Basic ) आधारित न देता बाजार किंमतीवर आधारित दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर देय असणारे भत्ते दिले जात असतात . यामुळे ज्या पदाचे मूळ वेतन अधिक असते , त्या पदास देय भत्ते अधिक मिळत असते . तर ज्या पदाचे मूळ वेतन कमी असते , अशा कर्मचाऱ्यांना सदर देय भत्ते खूप कमी प्रमाणात मिळत असते . त्यामुळे सदर कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो .

कमी मूळ वेतन असणाऱ्यांना होणार फायदा : ज्या पदाचे मूळ वेतन हे कमी असते , अशा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा घरभाडे भत्ता , वाहन भत्ता , प्रोत्साहन भत्ता इत्यादी देय भत्ते खूप कमी मिळत असतात . त्यांना बाजार मूल्यानुसार घर भाडे भत्ता , वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता अदा होणे आवश्यक आहे अशी मागणी कमी वेतन असणाऱ्या कर्मचारी संघटनांची ( class 4 employee)  आहे .

हे पण वाचा : दिवाळी सण अग्रिम मध्ये होणार वाढ ; जाणुन घ्या सविस्तर माहिती ..

सध्या शहरी भागामध्ये वास्तव करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , कमी मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाजार मूल्यानुसार घर भाडे भत्ता मिळत नाही . यामुळे त्यांना शहरी भागातून दूर वास्तव्य करावे लागते . त्याचबरोबर त्यांना सदर ठिकाणापासून कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवासाकरिता आवश्यक वाहन भत्ता मिळत नाही .

ही एक प्रकारची आर्थिक विसंगती असल्याने , कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते हे मूळ वेतनावर आधारित न ठेवता , बाजार मूल्य / वास्तव्य किमतीवर आधारित देण्याची मागणी करण्यात येत आहे .याबाबत आठवा वेतन आयोगामध्ये उचित अशी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे ..

Leave a Comment