Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ new pay commission new big update ] : आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते हे मूळ वेतनावर (Basic ) आधारित न देता बाजार किंमतीवर आधारित दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर देय असणारे भत्ते दिले जात असतात . यामुळे ज्या पदाचे मूळ वेतन अधिक असते , त्या पदास देय भत्ते अधिक मिळत असते . तर ज्या पदाचे मूळ वेतन कमी असते , अशा कर्मचाऱ्यांना सदर देय भत्ते खूप कमी प्रमाणात मिळत असते . त्यामुळे सदर कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो .
कमी मूळ वेतन असणाऱ्यांना होणार फायदा : ज्या पदाचे मूळ वेतन हे कमी असते , अशा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा घरभाडे भत्ता , वाहन भत्ता , प्रोत्साहन भत्ता इत्यादी देय भत्ते खूप कमी मिळत असतात . त्यांना बाजार मूल्यानुसार घर भाडे भत्ता , वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता अदा होणे आवश्यक आहे अशी मागणी कमी वेतन असणाऱ्या कर्मचारी संघटनांची ( class 4 employee) आहे .
हे पण वाचा : दिवाळी सण अग्रिम मध्ये होणार वाढ ; जाणुन घ्या सविस्तर माहिती ..
सध्या शहरी भागामध्ये वास्तव करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , कमी मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाजार मूल्यानुसार घर भाडे भत्ता मिळत नाही . यामुळे त्यांना शहरी भागातून दूर वास्तव्य करावे लागते . त्याचबरोबर त्यांना सदर ठिकाणापासून कामाच्या ठिकाणापर्यंत प्रवासाकरिता आवश्यक वाहन भत्ता मिळत नाही .
ही एक प्रकारची आर्थिक विसंगती असल्याने , कर्मचाऱ्यांना देय असणारे भत्ते हे मूळ वेतनावर आधारित न ठेवता , बाजार मूल्य / वास्तव्य किमतीवर आधारित देण्याची मागणी करण्यात येत आहे .याबाबत आठवा वेतन आयोगामध्ये उचित अशी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे ..
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026