वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दि.25.10.2025 ते 03.11.2025 या कालावधीत पुर्ण होणार ..

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Senior Pay Scale and Selection Pay Scale Training will be completed from 25.10.2025 to 03.11.2025. ] : वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण दिनांक 25.10.2025 ते दिनांक 03.11.2025 या कालावधीत पुर्ण होणार आहे , याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मार्फत दिनांक 07.10.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सदर प्रशिक्षणार्थींनी यापुर्वी नोंदणी केल्याने पुन्हा नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची आवश्यकता नसेल . तसेच अनुपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थींच्या गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल . व ऑफलाईन प्रशिक्षण दिनांक 25.10.2025 ते दिनांक 03.11.2025 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे .

दिनांक 02.06.2025 ते दि.12.06.2025 या कालावधीत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या परंतु प्रशिक्षणोत्तर चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी दिनांक 25.10.2025 ते दि.03.11.2025 या कालावधीमध्ये पुन्हा प्रशिक्षण पुर्ण करुन प्रशिक्षणोत्तर चाचणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .याकरीता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही .

कला व क्रिडा शिक्षकांचे तालुकास्तरीय 07 दिवसीय प्रशिक्षण दिनांक 25.10.2025 ते दि.31.10.2025 एकुण 07 दिवसाचे होणार आहे . याकरीता त्यांना दि.31.10.2025 रेाजी प्रशिक्षण कामी कार्यमुक्त करण्याचे यावे असे निर्देश देण्यात आले आहेत .

अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यंचे 10 दिवसांचे प्रशिक्षण हे राज्यस्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे मार्फत आयोजित केले जाणार आहेत . याबाबतच्या सविस्तर नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी करुन याबाबतच्या सुचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक )  शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी  Click Here

Leave a Comment