Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 01 day salary deduction from October salary of all employees in the state ] : माहे ऑक्टोंबरच्या वेतनातुन 01 दिवसांचे वेतन कपात करणेबाबत , दिनांक 08.10.2025 रोजी सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 08.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अतिवृष्टीमुळे आपतीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता राज्य सरकारकडून देखिल मदत कार्य सुरु असून , सदर नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व मदत व पुनर्वसन कामाकरीता हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व भारतीय प्रशासन सेवा / पोलिस सेवा / वन सेवा व राज्य सरकारचे सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा ..
सहभाग असावा या करीता माहे ऑक्टोंबर 2025 च्या वेतनातील प्रत्येकी 01 दिवसांचे वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणेबाबत आवाहन करण्यात येत आहेत .तसेच राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अखिपत्याखालील सर्व सरकारी / निमसरकारी कार्यालये ..
जिल्हा परिषद , पंचायत समिती , महानगरपालिका , नगरपालिका / नगरपरिषद , सार्वजनिक उपक्रमे , महामंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्था विभगा प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी सदर परिपत्रक विभागातील / कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचे व त्यांना याबाबत समजावून सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सदर एक दिवसाचे कपात करीता अधिकारी / कर्मचाऱ्यांचे अनुमतीपत्र देणे आवश्यक असणार आहे , याकरीता अनुपत्राचा नमुना सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे .
तसेच सदर 01 दिवसाचे वेतन कपात करताना ते मुळ वेतन व महागाई भत्ता यांच्या एकुण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !