Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ new pay commission latest big update] : आठवा वेतन आयोग संदर्भात आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .
दिनांक 01 जानेवारी 2026 पासून नवीन म्हणजेच आठवा वेतन आयोग ( New Pay commission) लागू होणे अपेक्षित आहे . परंतु सध्याची केंद्र सरकारची आठवा वेतन आयोग संदर्भात वस्तुस्थिती पाहिली असता , आठवा वेतन आयोग ( New Pay commission) प्रत्यक्षात लागू होण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता आहे ..
आठवा वेतन आयोगाच्या विविध समित्या अद्याप स्थापन नाही : वेतन आयोगाचा अभ्यास करण्यासाठी विविध समित्याची स्थापना करण्यात येत असते . परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या समितीचे गठन करण्यात आले नाहीत , यामुळे वेतन आयोगाच्या कामकाजास सुरुवातच नाही .
केंद्र सरकारने फक्त नवीन वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली परंतु या संदर्भात समितीचे गठन , अधिकृत कामकाज संदर्भात कोणतेही कार्यालयीन ज्ञापण जाहीर केले नाहीत .
यामुळेच आठवा वेतन लागू होण्यास बराच विलंब लागू शकतो . वेतन आयोगाची रचना करण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागतो . सातवा वेतन आयोगाचा (7th Pay commission) विचार केला असता , संपूर्ण वेतन आयोग कामकाजासाठी 33 महिने म्हणजेच दोन वर्ष 09 महिने इतका कालावधी लागला होता .
यामुळे सद्यस्थितीत आठवा वेतन आयोगाची कोणत्याही प्रकारची प्रत्यक्षात कामकाज सुरू न झाल्याने , प्रत्यक्षात अंमलबजावणी करिता विलंब होण्याची शक्यता आहे . सन 2028 पर्यंत हा विलंब लागू शकतो असे तज्ञांचे मत आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागेल.

- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025