कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या बाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.04.11.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding online transfer of employees issued on 04.11.2025 ] : कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदली बाबत ग्राम विकास विभाग मार्फत दि.04.11.2025 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2025 च्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दरम्यान बहुतांश न्यायालयीन प्रकरणे ही संबंधित जिल्हा परिषदांनी विहीत मुदत मध्ये अवघड क्षेत्र घोषित न केल्याने , बदली करीता पात्र तसेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्यांमध्ये अचुकता नसल्याने तसेच रिक्त पदांची  माहिती अचुक न भरल्या कारणाने उद्भवलेली आहे .

या सर्वांच्या परिणाम स्वरुप बदली प्रक्रिया दिनांक 31.05.2025 पर्यंत पुर्ण झालेली नाही . विविध न्यायालयीन प्रकरणांस सरकारला सामोरे जावे लागले .तसेच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत मा.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रिट याचिका तसेच अन्य याचिकांवर मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक 23.09.2025 रोजी दिलेल्य न्यायालयीन निर्णयांमध्ये प्रधान सचिव ( ग्राम विकास ) यांनी सन 2026-27 च्या बदली प्रक्रिया मध्ये …

विलंब होणार नाही , याकरीता आवश्यक त्या सुचना निर्गमित करणेबाबत त्याचबरोबर दिनांक 07.11.2024 रोजीच्या पत्रांमध्ये यापुर्वी निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियाचे वेळापत्रक देखिल उचित सुचना निर्गमित करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहेत .अतिरिक्त सुचना पुढीलप्रमाणे आहेत .

01.मा.न्यायालयाने दिलेले निर्देश व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 बाबत नमुद वस्तुस्थिती विचारात घेता जिल्हा परिषद शिक्षकांच्या या पुढील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिनांक 07.11.2024 रोजीच्या पत्रानुसार विहीत करण्यात आलेले वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

तसेच दिनांक 18.06.2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया करीता संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सक्षम प्राधिकारी असणार आहेत .

तसेच तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याकरीता मे.विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे यांनी प्रत्येक जिल्हा परिषद करीता आवश्यकता नुसार समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणुक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच विहीत वेळापत्रकानुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पुर्ण करण्याबाबतची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची असणार आहे .तसेच सर्व जिल्हा परिषदांनी मे.विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे यांच्याशी परस्पर समन्वयाने विहीत वेळापत्रकानुसार , विहीत केलेल्या टप्यांनुसार पुढील बदली प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच बदली प्रक्रियामध्ये विलंब झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही संबंधित जिल्हा परिषद यांची असेल , याची नोंद घेण्याची निर्देश देण्यात आले आहेत .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment