Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Bill for facilities for senior citizens. ] : जेष्ठ नागरिकांना दरमहा रुपये 7000/- रुपये मानधन , मोफत आरोग्य सुविधा तसेच प्रवास करीता 15,000/- रुपये अनुदान इ. सोयी सुविधांचे विधेयक महाराष्ट्र शासनांकडून सादर करण्यात आले आहेत .
सदर विधेयक हे राज्याच्या विधानसभेत दिनांक 15.07.2025 रोजी सादर करण्यात आले व विधानसभा नियम 116 नुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे . सदर विधेयकास महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक ( सेवा , सुविधा इ. देणेबाबत ) अधिनियम 2025 असे संबोधित करण्यात येत आहे .सदर विधेयकास मंजूरी मिळाल्याच्या नंतर तात्काळ अंमलात येईल असे नमुद करण्यात आले आहे .
सदर विधेयकाची व्याख्या : महाराष्ट्र राज्यातील ज्या व्यक्तींचे वय हे 65 वर्षे व त्यापेक्षा अधिक असेल अशा महिला / पुरुष यांच्याकरीता सदर विधेयक ज्येष्ठ नागरिक म्हणुन संबोधण्यात आले आहेत .
विधेयकांमध्ये नमुद सोयी – सुविधा : –
01.दरमहा मानधन : ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7000/- रुपये आर्थिक सहाय्य .
02.ज्येष्ठ नागरिक आजारी पडल्यास त्यांना रुपये 5 लाख पर्यंत सरकारी / निमसरकारी रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य सुविधा .
03.महाराष्ट्र दर्शन करीता प्रतिवर्षी 15,000/- रुपये अनुदान .
04.मुल नसल्यास अथवा वारस सांभाळ करीत नसल्यास , सरकारी मार्फत मोफत जेवण व राहण्याची सर्व व्यवस्था .
05.ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी व समस्या करीता टोलफ्री हेल्पलाईन .

- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !