ऐन दिवाळी सणात सोने / चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण ; जाणून घ्या नविन दर ..

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Big drop in gold/silver prices in Diwali ] : ऐन दिवाळी सणात सोने / चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे . यामुळे सोने खरेदीसाठी इच्छुकांना मोठी सुवर्णसंधी मिळाली आहे .

सध्या दिवाळी सण सुरु आहे , यांमध्ये सोन्याच्या खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे . यंदा दरवर्षी पेक्षा सर्वाधिक सोने खरेदी केली जात आहे . काल बुधवारी सोने / चांदीच्या किंमती अचानकपणे कोसल्याने , सोने खरेदीदारांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे .

या वर्षी सोने – चांदीच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ झाली असून , प्रथमच सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे . आंतरराष्ट्रीय सोन्याच्या मार्केटमध्ये सोन्याचे दर घसरल्याने , सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे .

सोन्याच्या किंमतीत 4120/- रुपयांनी घसरण : मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 132,870/- रुपये इतके होते तर बुधवारी ( दिनांक 22.10.2025 ) रोजी सोन्याच्या किंमतीत चक्क 4120/- रुपयांची घसरण झाल्याने , 24 कॅरेट सोन्याचे भाव 128,750/- रुपये पर्यंत घसरले .

हे पण वाचा : पोलीस शिपाई पदाच्या 7565 रिक्त पदांसाठी महाभरती .

काल परत दुपारच्या नंतर 2060/- रुपयांची घरसण झाल्याने , 24 कॅरेट सोन्याचे भाव 1,26,690/- रुपये पर्यंत घरसले . काल दिनांक 22 ऑक्टोंबर रोजी सोन्याच्या दरामध्ये तब्बल 6,180/- रुपयांची घसरण पाहायला मिळाली .

चांदीच्या दरामध्ये देखिल मोठी घसरण : चांदीच्या दरामध्ये देखिल काल मोठी घसरण पाहायला मिळाली . काल चांदीच्या किंमतीत प्रति किलो मागे 5150/- रुपयोची घट झाल्याने , प्रति किलो चांदीची किंमत 1,59,650/- रुपये पर्यंत सोन्याचे किंमत घसरले .  

Leave a Comment