Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Teachers who do not pass TET (Teacher Eligibility Test) will have to resign from their jobs. ] : शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांना सक्तीची नोकरी सोडावी लागणार का ? असा सवाल शिक्षकांना पडत आहे .
सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 01.09.2025 रोजीच्या निर्णयानुसार पुढील 02 वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे . या निकालानुसार राज्यातील मागास वर्गीय बहुजन कल्याण विभाग मार्फत देखिल आदेश जारी करत , जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाहीत अशांना सक्तीने निवृत्ती देण्याचा इशारा देण्यात आला आहे .
बहुजन कल्याण विभागाच्या दिनांक 17 ऑक्टोंबरच्या या आदेशामुळे तब्बल सव्वा लाख शिक्षक चिंतेत आहेत . सदर आदेशानुसार शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्यास पदोन्नतीची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत .
याशिवाय ज्यांचे निवृत्ती करीता 05 वर्षे पेक्षा अधिक वर्षे सेवा बाकी आहे अशांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे , अन्यथा निवृत्ती अनिवार्य असल्याचे सदर आदेशांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक संदर्भात महत्वपुर्ण GR निर्गमित दि.20.10.2025
सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयावर राज्य सरकार मार्फत तसेच इतर बऱ्याच वैयक्तिक पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
