नवरात्रोत्सव निमित्त बस महामंडळाची भन्नाट योजना ; साडेतीन शक्तीपीठाचे माफक दरात दर्शन !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Bus Corporation’s unusual plan for Navratri festival ] : बस महामंडळाची नवरात्रोत्सव निमित्त भन्नाट योजना काढली आहे . या योजनाच्या माध्यमातुन साडेतीन शक्तीपीठाचे माफक दरांमध्ये दर्शन होणार आहे .

सदर योजनाची सुरुवात ही दिनांक 27 सप्टेंबर 2025 पासुन सुरु होणार आहे . याकरीता पुणे विभाग मार्फत विशेष बस सेवा सुरु करण्यात येणार सून , स्वारगेट , शिवाजीनगर आगारातुन सकाळी 7 वाजता बस सुरु होणार आहे .

प्रवासाचा मार्ग : प्रथम कोल्हापुर महालक्ष्मीचे दर्शन त्यानंतर तुळजापुर – तुळजाभवनीचे दर्शन त्यानंतर माहुर – रेणुकादेवीचे दर्शन व त्यानंतर नाशिक सप्तशृंगीचे दर्शन करुन परतीचा प्रवास होईल .

प्रवासाचे भाडे : सदर योजनांच्या माध्यमातुन पुरुषांना प्रवासी भाडे हे 3101 तर महिला प्रवाशांसाठी 1549/- रुपये असे भाडे ठेवण्यात आले आहेत . प्रवास भाड्यांमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सुट दिलेली आहे .

हे पण वाचा : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.09.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

बुकींग कसे करावे ? : ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा ऑफलाईन पद्धतीने विभागीय कार्यालयांशी भेट देवून बुकींग करु शकता .

Leave a Comment