Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ MSRTC MAHABHARATI 2025 ] : महाराष्ट्र बस महामंडळ अंतर्गत मागील 05 वर्षांपासुन मोठी पदभरती झालेली नाही . यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढला आहे . यामुळे परिवहन मंत्र्यांनी बस महामंडळ अंतर्गत तब्बल 17450 रिक्त जागांसाठी पदभरती करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
परिवहन मंत्री मा.ना.प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार दिवाळी सणापुर्वीच सदर पदभरती पुर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत . सदरची पदभरती ही कंत्राटी स्वरुपाची असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे .
कोणत्या पदांसाठी पदभरती होणार ? : बस महामंडळ अंतर्गत चालक , वाहक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत . यामुळे चालक व वाहक पदाऐवजी सहाय्यक हे पद भरले जाणार आहेत .
एकुण जागा व वेतन : चालक व सहाय्यक पदांच्या तब्बल 17450 रिक्त जागेसाठी पदभरती कंत्राटी स्वरुपात करण्यात येणार असुन , सदर पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांना दरमहा 30,000/- रुपये वेतनमान अदा करण्यात येणार आहे .
सदरची पदभरती ही कंत्राटी स्वरुपाची असल्याने सदर कंत्राट हे 03 वर्षे कालावधी करीता असणे बाबत ई-निविदा प्रक्रिया काढण्यात आलेली आहे . तर दिवाळी सणापुर्वीच सदर पदभरती प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !