सेवार्थ प्रणाली मंजुर पदांचा ताळमेळ , बाबत वित्त विभाग मार्फत दि.31.10.2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ ; अन्यथा ऑक्टोंबरचे वेतन होणार नाही !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Deadline extended till 31.10.2025 through Finance Department regarding reconciliation of posts approved under the service system ] : सेवार्थ प्रणाली मंजुर पदांचा ताळमेळ बाबत वित्त विभाग मार्फत दिनांक 07.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सेवार्थ प्रणालीतील मंजुर पदांचा ताळमेळ दिनांक 31.10.2025 पर्यंत करण्याची अंतिम मुदत असणार आहे . याकरीता प्रथम प्राधान्यक्रम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . सदर काम पुर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र प्राप्त होईल .

सदर प्रमाणपत्र हे माहे ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत सादर करणे आवश्यक असेल . तसेच सदरची मुदत ही अंतिम असणार आहे , यामुळे या बाबीकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

प्रमाणपत्रांमध्ये सर्व पदे ही शासन निर्णयानुसार / आढाव्यानुसार अचुक आहेत याची खात्री करण्यात आलेली आहे असे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे . याशिवाय माहे ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबरचे वेतन आहरित करण्यात येणार नाहीत .

तर दिनांक 01.10.2025 रोजी देय होणाऱ्या माहे सप्टेंबर 2025 च्या वेतनाची देयके यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय , मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालय / उप कोषागार कार्यालये येथे स्विकारण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक )  शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी  Click Here

Leave a Comment