पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ; संपुर्ण राज्यास मुसळधार पावसाचा अलर्ट जारी – मराठवाडा , कोकण विभागास अतिवृष्टी .

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Heavy rain alert issued for entire state – Marathwada, Konkan regions to receive heavy rain ] : पुढील 24 तास राज्यास धोक्याचे , असुन संपर्ण राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे .

मराठवाडा : मागील आठवडा भरापासुन मराठवाडा विभागात अतिवृष्टी होत आहे , यामुळे मराठवाडा ( धाराशिव , लातुर , जालना , नांदेड , परभणी ) विभागातील शेतकऱ्यांचे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत . पुढील 24 तासासाठी देखिल मराठवाडा विभागास पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

पावसाचा ऑरेंज अलर्ट : राज्यातील छ.संभाजीनगर , नाशिक , रत्नागिरी ,सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने , अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक ( इ.1 ली ते 8 वी साठी ) पदासाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

पावसाचा रेड अलर्ट : नाशिकचा वायव्य भाग , तसेच पालघर , ठाणे , रायगड , पुण्याचा वायव्य भागात पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला . या रेड अलर्ट जिल्ह्यांमध्ये तुफानी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना देखिल पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

Leave a Comment