पेन्शनधारकांच्या बाबतीत सरकारकडून देण्यात आले महत्वपुर्ण स्पष्टीकरण ; डी.ए वाढ / पे कमीशन सुधारणा / पेन्शन रद्द .

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ pensioners news ] : केंद्र सरकारने नविन वित्त कायदा 2025 लागु केला आहे . सदर कायदा अंतर्गत पेन्शन धारकांना डी.ए वाढ रद्द करण्यात येत असल्याचे वृत्त समोर येत आहे . सदर सोशल मिडीयाच्या मेसेजवर सरकार दखल घेत….

शनिवार दि.13.12.2025 रोजी स्पष्टीकरण देण्यात आले आहे . पेन्शन धारकांना नविन वेतन आयोग अंतर्गत डी.ए वाढ व नविन पे कमीशन अंतर्गत सुधारित पेन्शनचा लाभ मिळणार नसल्याचे वृत्त सोशल मिडीयावर पसरवला जात आहे . सदर मेसेच हा चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे .

पेन्शन / डी.ए वाढ या प्रकरणी थांबविण्यात येणार : कर्मचाऱ्याच्या गैरवर्तन / गैरशिस्त तसेच निलंबित किंवा बडतर्फ अशा प्रकरणी पेन्शन तसेच निवृत्तीवेतन लाभांपासुन वंचित ठेवण्यात येईल तसेच त्यास सुधारित पे कमीशन नुसार पेन्शन लाभ मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे .

निवृत्तीवेतनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका .. फक्त  380 /- रुपये मध्ये घरपोच  पोस्टाने मिळेल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

याशिवाय जर कर्मचाऱ्यांने सेवा काळात कर्मचारी नियमावलीचे उल्लंघन केल्यास , त्यास निवृत्तीविषयक लाभ मिळणार नाहीत . तसेच इतर आर्थिक लाभांपासुन वंचित ठेवले जाईल .

यामुळे सध्या सोशल मिडीयावर पसरवले जाणाऱ्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे सुचित करण्यात आले आहेत .

Leave a Comment