Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding resignation of state employees (GR) ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या राजीनामा बाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 02.12.1997 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे.
सदर निर्णयानुसार ज्या राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना आपल्या पदाचा राजीनाम द्यावयाचा आहे , अशांनी सक्षम प्राधिकाऱ्याला योग्य मार्गाने राजीनामा द्यावयाचा अर्ज सादर करावा . अर्ज हा विनाशर्त असावा त्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी / शर्तीचा समावेश नसावा .
अर्जातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचा राजीनाम देण्याचा हेतु स्पष्ट झाल्याच्या नंतरच प्राधिकारी अर्ज मंजूरी करतील . तर राजीनामा देणेसंबंधी एक महिन्यांची पुर्वसुचना देणे आवश्यक असेल अन्यथा 01 महिन्याचे वेतन वसुली करण्यात येईल .
जर अनधिकृतरित्या गैरहजर असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर , अशा प्रकरणी अनधिकृत गैरहजेरीच्या दिनांकापासुन ते राजीनामा स्वीकृतीच्या दिनांकापर्यंतचा कालावधी सक्षम प्राधिकारी अनधिकृत गैरहजेरी म्हणून ठरवू शकेल अथवा अनधिकृत गैरहजेरी संबंधात शिस्तबभंगाची कारवाई होवू शकेल .
तसेच राजीनामा देतेवेळी कर्मचाऱ्याकडून शासनास कोणत्याही प्रकारची येणे नसावे , तसेच त्यास निलंबित करण्यात आले नसावे , तसेच त्याच्या विरोधात विभागीय चौकशी प्रलंबित / प्रस्तावित नसावी .
केंद्र सरकारच्या / अन्य राज्य शासनातील पदावर / महामंडळावरील नियुक्ती करीता राजीनामा : सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांची राज्य शासनाखेरीज अथवा केंद्र सरकारच्या अन्य शासनांतील पदावरील अथवा शासन अनुदानित संस्था / उपक्रम अथवा सरकार अंतर्गत असणाऱ्या मंडळे / महामंडळात नियुक्ती करीता निवड झाली असेल ..
अशा प्रकरणी सदर नियुक्ती करीता विहीत मार्गाने अर्ज केलेला असेल अथवा विहीत कार्यपद्धतीचा अवलंब केला असेल तर राजीनाम्या संबंधी एक महिन्याची पुर्वसुचना देण्याच्या अटीतून त्यास सुट देण्यात येते . मात्र सदरहू नविन नियुक्ती स्विकारण्यापुर्वी संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांने या राज्य सरकारच्या सेवेतील त्याच्या पदाचा राजीनाम देणे आवश्यक राहील .
या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता .
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025
