Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Brief information regarding pension, partial payment, retirement gratuity. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवृत्तीवेतन , अंशराशीकरण व सेवानिवृत्ती उपदान संदर्भात संक्षिप्त माहिती या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात .
निवृत्तीवेतन : जुनी निवृत्तीवेतन धारकांना पुर्ण पेन्शन प्राप्तीकरीता किमान 20 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक असेल , त्याकरीता 33 वर्षाची किमान अर्हताकारी सेवेची आवश्यकता राहणार नाही . यानुसार किमान 20 वर्षे सेवा पुर्ण झालेल्यांना निवृत्तीपुर्वी मिळणाऱ्या मुळ वेतनाच्या 50 टक्के इतकी रक्कम निवृत्ती वेतन म्हणून अनुज्ञेय आहे .
अंशराशीकरण गणना : अंशराशीकरण म्हणजे पेन्शनचा काही भाग एकरकमी घेणे , ज्यामुळे पेन्शनचा भाग कमी होतो . सदर अंशराशीकरणाची गणना करण्यासाठी मुळ निवृत्तीवेतन X 40% X 12 X अशंराशीकरणाचा सुधारित तक्त्यानुसार मूल्य . या सुत्राच्या आधारे सदर अंशराशीकरणाचे मुल्य काढले जाते .
सेवानिवृत्ती उपदान : कर्मचाऱ्यांने दीर्घकाळ केलेल्या सेवेच्या बदल्यात एकरकमी देण्यात येणारी रक्कम म्हणजे सेवानिवृत्ती उपदान होय . सेवानिवृत्ती उपदान रक्कम ही केंद्र सरकारच्या धर्तीवर 20 लाख रुपये इतकी एकरकमी रक्कम दिली जाते .
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026
