Mh-Tv@24 चंदना पवार प्रतिनिधी [ Important updates regarding TET exam for primary teachers in the state ] : राज्यातील प्राथमिक शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार आता टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे . याकरीता शिक्षकांना राज्य सरकारमार्फत प्रथम संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे .
इयत्ता 1 ली ते 8 वी करीता नियुक्त शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी ) उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे .
याकरीता राज्य सरकार मार्फत टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे . ही परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबरला असणार आहे . ही पहिली संधी असणार आहे . सदर परीक्षा दिवाळी सणाच्या नंतर लगेच येत असल्याने , शिक्षकांना आता दिवाळी सणांच्या सुट्टीमध्ये अभ्यास करावा लागणार हे निश्चित आहे .
टीईटी परीक्षा होण्यासाठी 02 वर्षांची मुदत : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 02 वर्षाच्या आत सदर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे . सदरची मुदत ही ज्यांचे वय हे 52 वर्षे पर्यंत आहे , त्यांच्यासाठी असणार आहे .
23 नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षेचे आयोजन केल्याने , आता शिक्षकांना येन दिवाळी सुट्टीमध्येच अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे .
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !