नविन वेतन आयोगामध्ये देय भत्तामध्ये वाढ तर काही नविन भत्यांची भर ; पेन्शन मध्ये दुप्पट वाढ – जाणून घ्या वेतन आयोग बाबत मोठी घोषणा !

Spread the love

 Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Increase in allowances and addition of some new allowances in the new Pay Commission; Double increase in pension – know the big announcement regarding the Pay Commission. ] : केंद्र सरकारने नुकतेच आठवा वेतन आयोग बाबत अधिकृत्त अधिसुचना निर्गमित करण्यात आली असुन , यानुसार समितीने कोणत्या बाबींचा अभ्यास करुन शिफारस करायची आहे .या बाबी नमुद करण्यात आलेली आहेत .

बोनस व बक्षीस : कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे बोनस या बाबींचा अभ्यास करुन बोनस हे उत्पादनावर आधारित देण्याचे तर अधिक उत्पादकक्षम कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याची शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

मुळ वेतन : कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे मुळ वेतनाचा फिटमेंट फॅक्टरच्या आधारे अभ्यास करुन मुळ वेतन निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

पेन्शन : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात वाढ होणार आहे , यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्या पेन्शन मध्ये आपोआप मोठी वाढ होईल .याशिवाय ज्यांना जुनी पेन्शन प्रणाली लागु आहे , त्यांना देय होणारे पेन्शन व उपदान नियम बाबत सदर समितीमार्फत शिफारस केली जाणार आहे .

या भत्यांमध्ये होणार मोठी वाढ : कर्मचाऱ्यांना देय असणारे प्रवास भत्ता , घरभाडे भत्ता , प्रोत्साहन भत्ता , गणवेश भत्ता इ. भत्यांमध्ये वाढ केली जाणार आहे .

या नविन भत्यांची होणार भर : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्तव्य भत्ता , विशेष कार्य भत्ता , तांत्रिक भत्ता , मोबाईलवर कार्य करणाऱ्यांना मोबाईल भत्ता इ . नविन भत्यांची भर घातली जाणार आहे .

Leave a Comment