Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ MSRTC MAHABHARATI 2025 ] : महाराष्ट्र बस महामंडळ अंतर्गत मागील 05 वर्षांपासुन मोठी पदभरती झालेली नाही . यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढला आहे . यामुळे परिवहन मंत्र्यांनी बस महामंडळ अंतर्गत तब्बल 17450 रिक्त जागांसाठी पदभरती करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
परिवहन मंत्री मा.ना.प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार दिवाळी सणापुर्वीच सदर पदभरती पुर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत . सदरची पदभरती ही कंत्राटी स्वरुपाची असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे .
कोणत्या पदांसाठी पदभरती होणार ? : बस महामंडळ अंतर्गत चालक , वाहक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत . यामुळे चालक व वाहक पदाऐवजी सहाय्यक हे पद भरले जाणार आहेत .
एकुण जागा व वेतन : चालक व सहाय्यक पदांच्या तब्बल 17450 रिक्त जागेसाठी पदभरती कंत्राटी स्वरुपात करण्यात येणार असुन , सदर पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांना दरमहा 30,000/- रुपये वेतनमान अदा करण्यात येणार आहे .
सदरची पदभरती ही कंत्राटी स्वरुपाची असल्याने सदर कंत्राट हे 03 वर्षे कालावधी करीता असणे बाबत ई-निविदा प्रक्रिया काढण्यात आलेली आहे . तर दिवाळी सणापुर्वीच सदर पदभरती प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025