Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ new employee rules ] : केंद्र सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे . जो की दिनांक 22 नोव्हेंबर 2025 पासून कार्यान्वित झालेला आहे . यामध्ये जुने व कालबाह्य झालेले एकूण 29 कामगार कायदे रद्द करण्यात आले आहे .
कामाच्या तासामध्ये वाढ : नवीन कामगार कायद्यानुसार आता कामगारांना 08 ते 12 तास व आठवड्यामध्ये 48 तास काम करावे लागणार आहे . सदरचा नियम खाण व विडी कामगार यांना लागू असणार आहे . जर हे कामगार सलग 30 दिवस काम केल्यास त्यांना बोनस द्यावा लागणार आहे .
कंत्राटी / रोजंदारी / बाह्य यंत्रणेतील कामगार : आता कंत्राटी / रोजंदारी / बाह्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वैद्यकीय / सामाजिक सुरक्षा त्याचबरोबर रजा द्यावी लागणार आहे .
त्याचबरोबर सर्वच कामगारांना किमान वेतन विहित कालावधीत देण्याची हमी यामध्ये देण्यात आली आहे . त्याचबरोबर 40 वर्षापेक्षा अधिक वयाच्या कामगारांना वर्षाला वैद्यकीय तपासणी भत्ता द्यावी लागणार आहे . याशिवाय ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतन द्यावे लागणार आहे .त्याचबरोबर धोकादायक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना 100% आरोग्य सुरक्षा द्यावी लागणार आहे .
💁💁निवृत्तीसाठी 01 – 08 वर्षे बाकी असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच निवृत्तीवेतन धारक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये PDF स्वरुपात.. लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
07 तारखेच्या आत वेतन : नवीन कामगार नियमानुसार 07 तारखेच्या आत पगार द्यावा लागणार आहे . तर एक वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रॅज्युइटी रक्कम द्यावी लागणार आहे .
महिलांना समान वेतन : सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषासोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावा लागणार आहे . वेतनामध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव करता येणार नाही .
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !