Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ November Paid in December 2025 Salary Grant Distribution ] : माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर 2025 वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 14.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , सन 2025-26 या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात आलेली आहे .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , प्राथमिक शिक्षण करीता स्थानिक संस्थांना सहाय्य , प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्यक , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण , 25 टक्के विद्यार्थी कोट्याकरीता शाळांना शुल्काची प्रतिपुर्ती करणे , जनजाती क्षेत्र उपयोजना , देखरेख व मुल्यमापन , इ. लेखाशिर्ष अंतर्गत निधीचे वितरण करण्यात आले आहेत .
लेखाशिर्ष निहाय नियंत्रक अधिकाऱ्यांस निधीचे वितरण तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता .
सदर निधी वितरीत करताना वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे / परिपत्रक / शासन निर्णयांचे पालन करणे बंधनकारक असणार आहेत .या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025
