पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यातील अधिकारी / कर्मचारी , शिक्षकांचा एक दिवस पगाराची कपात ..

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ One day salary deduction for state officials/employees, teachers for flood-affected farmers ] : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण झालेली आहे . यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत .

पुरग्रस्त शेतकऱ्यांना मुदत आर्थिक मदत मिळावी , याकरीता आता राज्यातील अधिकारी / कर्मचारी तसेच शिक्षक पुढे सरसावले असुन , एक दिवसाचे वेतन देण्यास स्वच्छेने परवानगी देण्यात आलेली आहे .

यासाठी राज्यातील विविध राजकीय पक्ष , कर्मचारी संघटनांनी पुढाकार घेतला आहे . यामध्ये राज्यातील राजपत्रित अधिकारी संघाचे तब्बल दीड अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करणेबाबत अधिकृत निवेदन राज्य सरकारकडे सादर केले आहेत .

हे पण वाचा : सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतनासाठी निधीचे वितरण ; GR निर्गमित दि.26.09.2025

त्याचबरोबर बृहन्मुंबई पालिका प्रशासनांमधील अभियंत्यानी देखिल एक दिवसाचा पगार कपात करण्यास परवानगी दिली आहे . याशिवाय राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात करणेबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठी घोषणा केली आहे .

सदर एक दिवसाचे वेतन हे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोंबर वेतनातुन करण्यात येणार आहे . यामुळे पुरग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे .

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment