सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगमध्ये मोठा झटका ; पगारवाढ व पदोन्नती करीता PBP धोरण लागु होणार  !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ PBP policy will be implemented for salary increment and promotion. ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग मध्ये मोठा झटका दिला जाण्याची शक्यता आहे . कारण पगारवाढ व पदोन्नती करीता PBP धोरण लागु केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

सन 2026 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा म्हणजेच नविन वेतन आयोग लागु करण्यात येणार आहे . नविन वेतन आयोगांमध्ये केंद्र सरकार मार्फत अमुलाग्र बदल केला जाणार आहे .

पगारवाढ / पदोन्नती करीता PBP धोरण : Performance Based Pay ( PBP ) धोरण म्हणजे कामाच्या आधारावर वेतन हे धोरण सध्या खाजगी क्षेत्रांमध्ये लागु आहे . हेच धोरण आता सरकारी क्षेत्रांमध्ये लागु केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै किंवा जानेवारी मध्ये 3 टक्के पगारवाढ दिली जाते , व पदोन्नती ही सेवाज्येष्ठता नुसार दिली जाते . तर आता हे गणित बदलण्याची शक्यता आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

कर्मचाऱ्यांने वर्षभरात केलेल्या कामकाजाच्या आधारावर गुण दिले जाणार आहे . तसेच पदोन्नती करीता दरवर्षी परीक्षांचे देखिल आयोजन केले जाणार आहे , सदर गुणांची गोळाबेरीज करुन कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच बोनस व बक्षीस स्वरुपात वाढीव पगारवाढ दिली जाणार आहे .

या धोरणांमुळे प्रशासकीय कामकाजाची कामकाजांमध्ये गती येणार आहे . ज्यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्वरुपात सत्कार होईल .

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment