अधिकारी / कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पडताळणी करणेबाबत , परिपत्रक दि.18.09.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding inspection of officers/employees as well as teachers and non-teaching staff, circular dated 18.09.2025 ] : दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मार्फत दिनांक 18.09.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करयात आला आहे .

सदर परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्यांपैकी अधिकारी / कर्मचारी व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राचे आधारे सरकारच्या विविध लाभ जसे सरळसेवा नियुक्ती , अतिरिक्त प्रवास भत्ता , बदली अशा सवलती घेत असतात .

माहितीचा अधिकारी अधिनियम मध्ये नमुद करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र बाबत साशंकता व्यक्त करण्यात आल्याने सदर प्रमाणपत्रांची पडताळण करणे आवश्यक असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

याकरीता सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : 10 वर्षे रोजंदारी / तासिक तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित करणेबाबत GR निर्गमित दि.17.09.2025

तर दिव्यांग नसुन देखिल लाभ घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना 02 वर्षांपर्यंत कारावास अथवा 01 लाख रुपये दंड अथवा यापैकी दोन्ही शिक्षा देण्यास पात्र ठरविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment